शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

बुलडाणा जिल्ह्यासाठी चार ‘विठाई’ बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 2:31 PM

शेगाव आणि मेहकर आगाराला प्रत्येकी दोन बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- सोहम घाडगेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून जिल्ह्यासाठी चार नवीन मिळाल्या आहेत. शेगाव आणि मेहकर आगाराला प्रत्येकी दोन बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेगाव ते पंढरपूर सेवा सुरु झाली आहे, तर मेहकर आगाराच्या बस लवकरच सेवेत दाखल होणार होणार आहेत. विठाई बससेवेमुळे विठ्ठल भक्तांचा प्रवास आरामदायी होणार आहे.पंढरपुर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. दररोज हजारो भाविकांची पावले पंढरीकडे वळतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपºयातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपुरात येणाºया भाविकांसाठी विठाई ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे.विठ्ठल भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने विठाई ची रचना आकर्षक बनवली आहे. लाल आणि पांढºया रंगातील विठाई बस उठून दिसते. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकरी यांचे चित्र आहे. आरामदायी आसन व्यवस्था जमेची बाजू आहे. हवा खेळती राहावी याकरिता मोठ्या खिडक्या देण्यात आल्या आहेत. इतर बसपेक्षा विठाई बसची उंची जास्त असल्याने प्रवास आरामदायी होईल. रा. प. महामंडळाच्या आधीच्या बस अ‍ॅल्युमिनियमच्या होत्या. विठाईसाठी पोलादी पत्र्याचा वापर करण्यात आला आहे. आरामदायक आसने, दोन आपत्कालीन दरवाजे असून एकूण ४२ प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. २२ पुश बॅक सीट असल्याने वारकºयांचा पंढरपूर तसंच पंढरपूर ते आपल्या गावापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे. सोबतच प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणं आवश्यक असेल. माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.

बºयाच कालावधीपासून बुलडाणा आगाराला नवीन बस मिळाल्या नव्हत्या. आता चार नवीन विठाई बस मिळाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरला जाणाºया विठ्ठल भक्तांची सोय झाली असून एसटीच्या उत्पन्नातही भर पडेल.- संदीप रायलवारविभाग नियंत्रक, रा. प. बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीShegaonशेगावMehkarमेहकर