राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-काळीपिवळीचा अपघात; चार जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:53 IST2018-01-14T00:51:25+5:302018-01-14T00:53:39+5:30
मलकापूर: काळी-पिवळी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन काळी-पिवळी चालकासह ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडली.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-काळीपिवळीचा अपघात; चार जण गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: काळी-पिवळी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन काळी-पिवळी चालकासह ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडली.
एम.एच.२८ आर २0७५ क्रमांकाची काळी-पिवळी ९ ते १0 प्रवासी घेऊन नांदुर्यावरून मलकापूरकडे येत होती, तर एम.एच.१९ झेड 0७४९ क्रमांकाचा ट्रक नांदुर्याकडे जात होता. दरम्यान, या दोन्ही वाहनांची बेलाड फाट्यानजीक समोरासमोर धडक झाली. या अपघातात काळी-पिवळीचा चालक गजानन बळीराम पवार (वय ३५) रा. वाघुड, तसेच प्रवासी शेख मुकिम शेख अमिर कुरेशी (वय ३0) रा. मलकापूर, शेख अनिस शेख इस्माइल (वय ५0) रा. जळगाव जमाोद, प्रशांत गजानन दातीर (वय २४) रा. जळगाव जामोद असे ४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात काळी-पिवळीचा अक्षरश: चुराडा झाला, तर या भीषण अपघातात चालक गजानन पवार हा क्षतिग्रस्त काळी- पिवळीत पूर्णत: फसला होता. दरम्यान, गणेश कावणे, संदीप नरवाडे, कैलास नरवाडेसह इतरांनी टॉमीच्या साहाय्याने काळी-पिवळीची पत्रे वाकवित जखमी चालक पवार यास काळी-पिवळीतून मोठय़ा हिमतीने बाहेर काढले.