शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खंडणी मागणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:15 AM

शेगाव: तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून  खंडणी मागणार्‍या अकोला आणि वाशिम जिल्हय़ातील चार तोतया पत्रकारांना  शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

ठळक मुद्देलॉज व्यवस्थापकाला करीत होते ब्लॅकमेलकार, ओळखपत्र, रेकॉर्डिंगचे साहित्य जप्त   

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून  खंडणी मागणार्‍या अकोला आणि वाशिम जिल्हय़ातील चार तोतया पत्रकारांना  शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. रविवारी पहाटे मंदिर परिसरात  ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून बनावट ओळखपत्र, रेकॉर्डिंगचे  साहित्य आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहे.शेगाव शहरात प्रमुख व्यवसाय म्हणजे लॉजेस आहे. त्यामुळे लॉजमालकांना  ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने अकोला व वाशिम  जिल्हय़ातील चार कथित पत्रकार शेगावात दाखल झाले. त्यांनी काही  लॉजमालकांना गाठून तुमच्या लॉजमध्ये अवैध व्यवसाय चालत असून, त्याचे  व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आम्हाला लॉजेस चेक करण्याचा अधिकार  आहे. पोलीसही आमचे काही करू शकत नाही, असे बोलून रात्री चार लॉजेसमध्ये  धुमाकूळ घातला. सदर इसम हे तोतया पत्रकार असल्याचे लक्षात आल्यावरून  विशाल गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक मुजीब हुसैन रियाज हुसैन यांनी पोलिसांना  पाचारण केले. पोलिसांनीही हा प्रकार पहिला. यावेळी मद्यधुंद असलेल्या या आरो पींनी पोलिसांनाही जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवून सर्वांना गाडीत  टाकले. त्यांच्याकडून एक कार, बनावट ओळखपत्र, रेकॉडर्ि्ंगचे साहित्य आणि  मोबाइल जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुजीब हुसैन यांच्या फिर्यादीवरून शहर  पोलिसांनी आरोपी जितेंद्र राऊत रा. वाशिम, राजकुमार वानखडे रा. वाशिम, मयूर  महल्ले रा. पिंजर आणि दीपक ठाकरे रा. मंगरुळपीर यांच्याविरुद्ध अप.क्र.४८९/१७  कलम ३८४, ५0४, ५0६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा शेगाव पोलिसात दाखल  करण्यात आला. सदर आरोपींना स्थानिक न्यायालयात १९ नोव्हेंबर रोजी हजर  केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश  दिले. घटनेचा पुढील तपास सपोनि. भारती गुरनुले ह्या करीत आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक