शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

अमरावती-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण सुरू; पुलांचा पत्ता नाही!   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:48 IST

अकोला : अनेक दिवसांपासून रखडलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमरावती-चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम अखेर सुरू झाले असले तरी, मार्गातील मोठे पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला प्रारंभही   करण्यात आला नसल्याने, निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पूल निर्मितीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, कुठल्याही मार्गाचे काम सुरू करताना सर्वप्रथम पुलांचे काम हाती घेतले जाते; मात्र अमरावती-चिखली मार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ करताना मोठय़ा पुलांच्या निर्मितीचे काम थंड बस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या अमरावती-चिखली टप्प्याच्या कामाचा अफलातून प्रकार१४ मोठय़ा पुलांच्या निर्मितीला सुरुवातही नाही!

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अनेक दिवसांपासून रखडलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमरावती-चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम अखेर सुरू झाले असले तरी, मार्गातील मोठे पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला प्रारंभही   करण्यात आला नसल्याने, निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पूल निर्मितीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, कुठल्याही मार्गाचे काम सुरू करताना सर्वप्रथम पुलांचे काम हाती घेतले जाते; मात्र अमरावती-चिखली मार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ करताना मोठय़ा पुलांच्या निर्मितीचे काम थंड बस्त्यात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नागपूर-अमरावती टप्प्याचे चौपदरीकरण झाले असून, आता अमरावतीपासून महाराष्ट्र-गुजरात सीमेपर्यंत चौपदरीकरण करण्यात येत आहे; मात्र या कामास सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. प्रारंभी हे काम अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते महाराष्ट्र-गुजरात सीमा असे दोन टप्प्यात करण्यात येणार होते. लार्सन अँण्ड टुबरे या कंपनीने दोन्ही टप्प्यांचे कंत्राटही घेतले होते; मात्र करारानंतर ३८0 दिवस उलटल्यावरही, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ८0 टक्के जमिनीचे संपादन न करू शकल्याने, त्या कंपनीने काम सोडून दिले होते. नंतर जून २0१५ मध्ये सदर काम अमरावती-चिखली, चिखली-फागणे आणि फागणे-महाराष्ट्र-गुजरात सीमा असे तीन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  त्यापैकी विदर्भातील  अमरावतीपासून बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील चिखलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएल अँण्ड एफएस) लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या आयएल अँण्ड एफएस ट्रान्सपोर्टेशन लिमिटेड (आयटीएनएल) या कंपनीला मिळाले आहे.  

बोरगाव मंजू, खामगाव, नांदुर्‍यात नवे बायपास विस्तार आणि लोकसंख्या जास्त असलेल्या तीन गावांच्या बाहेरून नवे वळणरस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये  खामगाव, नांदुरा व बोरगाव मंजूचा समावेश आहे.

१४  मोठे पूल! एकूण १४ मोठे पूल तयार करावे लागणार आहेत. त्यामध्ये उमा, काटेपूर्णा, मोर्णा, मस व मन या नद्यांवरील पुलांशिवाय, काही रस्त्यांवरील पुलांचाही समावेश आहे; मात्र अद्याप एकाही पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

८ ठिकाणी अर्बन बिल्ट अप सेक्शनचौपदरीकरणाच्या कामात, लोणी, कुरूम, मूर्तिजापूर, अंभोरा, अकोला, वाघूळ, मलकापूर आणि धरणगाव या ठिकाणी अर्बन / सेमी अर्बन बिल्ट अप सेक्शनचा समावेश आहे. त्या अंतर्गत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कुंपन, महामार्गास समांतर सर्व्हिस रोड, दुभाजकांवर पथदिवे, सिग्नल आदी सुविधांची व्यवस्था करण्यात येईल. एकूण ३८ ठिकाणी सर्व्हिस रोडची निर्मिती करण्यात येईल. 

महामार्गातील मोठय़ा पुलांचे बांधकाम, डिर्झानअभावी रखडले आहे. पुलांच्या डिझाईनची मंजुरी विविध टप्प्यावरून होते. सध्या तीन पुलांची डिझाईन पूर्ण झाली असून, इतर पुलांच्या डिझाईनचे कामही शेवटच्या चरणात आहे. महामार्गाच्या बांधकामात आम्ही गुंतवणूकदार आहोत, त्यामुळे  सर्व बाबींवर आम्हाला लक्ष द्यावे लागते. बांधकामाचे थर्ड पार्टी ऑडिटही होत असते. म्हणूनही आम्ही थांबलो आहोत.  - जी.के.त्रिपाठी, प्रकल्प संचालक , आयएल अँण्ड एफएस कंपनी.

टॅग्स :Akola cityअकोला शहरhighwayमहामार्गbuldhanaबुलडाणाAmravatiअमरावती