शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

समृद्धी महामार्गावर २४ तासात तीन अपघातामध्ये चार जण ठार, सहा जखमी

By निलेश जोशी | Updated: June 4, 2023 12:26 IST

फर्दापूर टोल नाक्याच्या लगत घडले तिन्ही अपघात: मृतामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचा समावेश

बुलढाणा/ मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्यालगतच्या सुमारे दहा किमीच्या पट्टयात गेल्या २४ तासात झालेल्या तीन अपघातामध्ये चार जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील तिघांचा तर उत्तरप्रदेशमधील एकाचा समावेश आहे. जखमी धुळे जिल्ह्यातील आहेत.

समृद्धीवर चॅनल क्रमांक २८३ वर झालेल्या अपघातामध्ये वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले असता भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले. यामध्ये एकाचा घटनास्थळीच तर दोघांचा मेहकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. मृतामध्ये विजय शेषराव मान्टे (४८), अेाम मान्टे (२०), तुषार मान्टे (३४) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच फरर्दापूर पोलिस मदत केंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

दुसऱ्या अपघातामध्ये धुळ्यातील पाच जण जखमीदुसरा अपघात हा समृद्धी महामार्गावरच ४ जून रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. चॅनल क्रमांक २७४ लगत हा अपघात एमएच-४७-क्यू-७८२८ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला. हे वाहन धुळ्यावरून नागपूरकडे जात होते. हर्षद शिंदे, अविनाश शिंदे आणि अन्य चार जण नागपूरकडे जात होते. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनात असलेले धुळे येथील सहा जण जखमी झाले आहेत. यातील अविनाश शिंदे यांना गंभीर इजा झाली आहे. या जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

तिसऱ्या अपघातात ट्रक चालक  ठारतिसरा अपघात हा ३ जून रोजी घडला. या मध्ये यूपी-५०- डीटी-७१८१ क्रमांकाच्या ट्रकने केए-०१-एएच-६०५४ क्रमांकाच्या कंटेनरला मागिल बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये उत्तर प्रदेशातील आझमगड येथील ट्रक चालक दिनेशुकमार तिवारी याचा ट्रकच्या कॅबिनमध्येच अडकून मृत्यू झाला. त्याला वाहन चालवितांना डुलकी लागल्याने मागील बाजूने समोरील कंटेनरवर त्याचा ट्रक धडकून रस्त्यालगत क्रॅश बॅरियर तोडून वाहन ३० फुट  खोल खाली पडले.

मोठा अनर्थ टळलापहाटे चार वाजेच्या सुमारास फर्दापूर टोल नाक्यानजीक झालेल्या अपघातादरम्यान लग्नाच्या वऱ्हाडातील चार ते पाच वाहने एकामागे एक थांबली होती. अपघातामध्ये मृत पावलेले तिघेजण एमएच-२८-एझेड-७५४६ क्रमांकाच्या वाहनात बसत असतानाच अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना उडविले. यावेळी थोडेजरी नियंत्रण हुकले असते तर येथे मोठी जिवित हानी होण्याची शक्यता होती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात