Four killed in container-car collision on national highway | राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर-कारच्या धडकेत अकोल्यातील चौघे ठार

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर-कारच्या धडकेत अकोल्यातील चौघे ठार

ठळक मुद्देकार क्रमांक एमएच-२७, एआर-३६३२ अकोल्याकडे जात होती.कंटेनर क्रमांक आरजे-१८ जीबी-२५८९ या वाहनाने जोरदार धडक दिली.त्यामध्ये कारमधील चौघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे.

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर कोलोरी गावानजिक गव्हाण फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील चार जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. जखमीला उपचारासाठी खामगावात आणण्यात आले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एमएच-२७, एआर-३६३२ अकोल्याकडे जात होती. त्याचवेळी खामगावकडे भरधाव येणाºया कंटेनर क्रमांक आरजे-१८ जीबी-२५८९ या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारमधील चौघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये अकोल्यातील शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे वय-५०, पप्पू मनोहर जोशी वय-४५, अतुल शंकरराव व्यवहारे वय-४७, राहुल सातळे-४० यांचा समावेश आहे. तर अनिल मावळे नामक व्यक्ती गंभीर जखमी आहे. उपचारासाठी त्यांना खामगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कारचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शियांनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह गॅसकटरच्या साह्याने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे हेकॉ. खर्चे, जावेद शेख, गवई, खोले यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

Web Title: Four killed in container-car collision on national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.