Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, १०८० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 11:29 IST2021-04-25T11:28:53+5:302021-04-25T11:29:01+5:30
Corona Cases : शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, १०८० जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले.

Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, १०८० जण पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, १०८० जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ६६९० संदिग्धांच्या अहवालांपैकी ५ हजार ६१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीमध्ये बुलडाणा तालुक्यातील १२३, खामगावमधील ९९, शेगावमधील १२, देऊळगाव राजामधील ८२, चिखलीमधील ७८, मेहकर तालुक्यातील १३३, मलकापूर तालुक्यातील ८०, नांदुऱ्यातील १८७, लोणारमधील ८६, मोताळ्यातील ४३, जळगाव जामोदमधील ६८, सिंदखेड राजातील ८८ आणि संग्रामपूर तालुक्यातील १ जण बाधित आढळून आला. दरम्यान, चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ४८ वर्षीय पुरुष, पांचाळा येथील ५० वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील ६० वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील कोलोरी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता ५७ हजार ८१५ झाला असून, त्यापैकी ५० हजार ४०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयामध्ये ७ हजार ४१ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्यापही ४ हजार ९५४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. शनिवारी १ हजार ३७८ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.