घरफाेडी करणारे चाेरटे गजाआड, ४ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST2021-08-01T04:32:27+5:302021-08-01T04:32:27+5:30

माेताळा : तालुक्यातील धामणगाव बढे येथील घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने शाेध लावून दाेघांना ३१ जुलै राेजी अटक ...

Four burglars arrested, Rs 4 lakh seized | घरफाेडी करणारे चाेरटे गजाआड, ४ लाखांचा ऐवज जप्त

घरफाेडी करणारे चाेरटे गजाआड, ४ लाखांचा ऐवज जप्त

माेताळा : तालुक्यातील धामणगाव बढे येथील घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने शाेध लावून दाेघांना ३१ जुलै राेजी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

धामणगाव बढे येथे अज्ञात चाेरट्यांनी घरफोडी करून लाखाे रुपयांचा ऐवज लंपास केला हाेता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून ३१ जुलै राेजी रवींद्र नामदेव बावस्कर, रा. नलकुंड, ता. माेताळा या मुख्य आराेपीसह त्याला मदत करणाऱ्या सुधाकर तुळशीराम धेंगे, रा. जनोरी, ता. शेगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, गहूमणी पोत, फुल जोड, अंगठी, चांदीचे ब्रेसलेट, पाटल्या, चांदीचे दंडकडे, एकदाणी, राेख ६८ हजार व दुचाकी, असा ४ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात व पाेलीस निरीक्षक गिते यांच्या मार्गदर्शनात पोउपनि नीलेश शेळके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, दीपक पवार, गजानन आहेर, गजानन गोरले, विजय सोनोने, चालक सुधाकर बर्डे यांच्या पथकाने केली.

Web Title: Four burglars arrested, Rs 4 lakh seized