शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांना हादरे; सामान्यांचा विजय

By admin | Updated: October 20, 2014 00:17 IST

बुलडाणा जिल्ह्यात भल्या माणसांना जनतेची पसंती; राष्ट्रवादीचे घड्याळ बंद तर भारिपचा भोपळा.

राजेश शेगोकार /बुलडाणाबुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाचे दर्शन घडविणारे आहे. संपत्तीमधून सत्ता व सत्तेमधून संपत्ती या दुष्टचक्रामुळे सामान्यांना राजकारणाचा तिटकारा येऊ लागला होता. प्रत्येक निवडणुकीत तेच ते चेहरे आलटून पालटून लोकांसमोर येत होते. यावेळी मात्र लोकांनी नव्या चेहर्‍यांना पसंती देत जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्रच बदलवून टाकले आहे. राजकारणातील भल्या माणसांना ताकद देऊन सामान्यांनी इतिहास घडविला. निकालाच्या आकडेवारीमध्ये काँग्रेसची संख्या कायम राहिली असली तरी खामगावा तील काँग्रेसचा पराभव पक्षासाठी धक्कादायक आहे. असाच प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडला. सेनेच्या जागा दोन जागा कायम राहिल्या असल्या तरी बुलडाण्यात सेनेला मिळालेले चौथे स्थान लाजीरवाणे ठरले आहे. तिकिटासाठी रातोरात पक्ष बदलवून निवडणूक लढविणार्‍यांनाही जनतेने नाकारले.बुलडाणा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. विचार, विश्‍वास व विकास या मुद्दय़ांवर रिंगणात उतरलेले हर्षवर्धन सपकाळ हे विरोधकांपेक्षाही स्वपक्षीयांच्या टीकेचे व चेष्टेचे विषय बनले होते. तरीही केवळ सामान्यांचा विश्‍वास व त्यांच्याच लोकवर्गणीच्या भरवशावर सपकाळ यांनी विजय मिळविला. विशेष म्हणजे, दुसर्‍या क्रमांकावर शिवसेना किंवा भाजपा राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, मनसेच्या संजय गायकवाड यांनी सपकाळांच्याच प्रचार तंत्रासारखा प्रचार राबवून दुसर्‍या क्रमांकावर झेप घे तली.भाजपच्या योगेंद्र गोडे यांनी पक्षबदल करून लढविलेली निवडणूक ही अतिशय नियोजनबद्ध होती. त्यांनी प्रचाराचा धडाका उडवला. मात्र, पैशांचा अतिवापर झाल्याचा प्रचार त्यांच्या अंगलट आला. शिवसेनेचे विजयराज शिंदे हे जनता गाडी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, जनतेची सुप्त नाराजी ते ओळखू शकले नाहीत. सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीत निर्माण झालेली अस्वस्थता मतपेटीतून उमटली. ठळक वैशिष्ट्ये* जातीय राजकारणाला पुर्णविराम या निवडणुकीच्या निमित्याने मिळाला आहे. सर्वसामान्य मतदारांनी ताकद दाखविली.*नेहमीप्रमाणे सर्वांत आधी मेहकर मतदारसंघाचा निकाल आला व सर्वांत शेवटी मलकापूर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. खामगावबाबत राज्यभरात उत्सुकता होती.*मोदींची सभा झालेल्या ठिकाणी भाजपचा विजय झाला, तर राहुल गांधी यांच्या सभाक्षेत्रात काँग्रेस विजयी झाली. मात्र, उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा पराभव झाला.