बुलडाण्यात शिवस्मारकाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:39 IST2021-02-23T11:39:05+5:302021-02-23T11:39:18+5:30

Shiv Smarak in Buldana छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती व शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

Foundation stone of Shiv Smarak in Buldana | बुलडाण्यात शिवस्मारकाची पायाभरणी

बुलडाण्यात शिवस्मारकाची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहराचे वैभव ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी करण्यात आली.  
स्थानिक शिवतीर्थ संगम चौक येथे आमदार तथा शिवस्मारक समिती कार्याध्यक्ष धर्मवीर संजय गायकवाड  यांच्या  हस्ते व विधान परिषदेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिंदवी  स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती व शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख  जालिंधर बुधवत, शिवस्मारक समिती उपाध्यक्ष  राजेश हेलगे, अजय लाहोटी, उमेश शर्मा, भारत शेळके, धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड तसेच इतर उपस्थित हाेते.

Web Title: Foundation stone of Shiv Smarak in Buldana