फोटोग्राफर असोसिएशच्या कार्यकारिणीचे गठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:55+5:302021-06-17T04:23:55+5:30

चिखली तालुका फोटोग्राफर असोसिएशनची बैठक १४ जून रोजी पार पडली. या बैठकीला तालुक्यातील बहुतांश फोटोग्राफर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम ...

Formation of the Executive of the Photographers Association | फोटोग्राफर असोसिएशच्या कार्यकारिणीचे गठण

फोटोग्राफर असोसिएशच्या कार्यकारिणीचे गठण

चिखली तालुका फोटोग्राफर असोसिएशनची बैठक १४ जून रोजी पार पडली.

या बैठकीला तालुक्यातील बहुतांश फोटोग्राफर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम फोटोग्राफर सागर राजा, कृष्णा हिंगे, पिंटू महाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोटोग्राफर रवी शिराळे यांनी एक वेबसिरीज तयार केल्याबद्दल व शेलोडी येथील फोटोग्राफर समाधान रिठे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यवसाय आर्थिक अडचणीत आला असतानाही शासन याकडे सहानुभूतीने पाहत नसल्याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी बेलोकर, सचिवपदी रक्ताडे तर उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी यासिन शाह, कमलेश पारीक, सहसचिवपदी विशाल होगे, कोषाध्यक्षपदी बाजीराव बाप्पू देशमुख, संघटकपदी सुदर्शन इंगळे, आणि सल्लागारपदी किरण महाडीक यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. बैठकीला रविकांत वानखडे, राहुल महाजन, जयेश बेलोकर, दीपक पाटील, गणेश कोल्हे, दीपक साळवे, कुंदन म्हाळणकर, गजानन परिहार, विजय खरे, दीपक खांदवे यांच्यासह तालुक्यातील फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

Web Title: Formation of the Executive of the Photographers Association