बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:33 IST2021-04-24T11:32:36+5:302021-04-24T11:33:19+5:30

Corona Cases : आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच १०३५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़

Five more killed in Buldana district, 1035 positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटीव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, १०३५ पाॅझिटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच १०३५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़. तसेच ४ हजार ८५८ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले असून ७३३ जणांनी काेराेनावर मात केली आहे़ उपचारादरम्यान किन्होळा ता चिखली येथील २७ वर्षीय महिला, बोरगाव काकडे ता़ चिखली येथील ५८ वर्षीय महिला, सालीपुरा मलकापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, धाड ता. बुलडाणा येथील ६७ वर्षीय पुरुष व कुंबेफळ ता. बुलडाणा येथील ५८ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझीटीव्ह आलेले रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील २०८, सुंदरखेड ५, चौथा ५, डोमरूळ ४, करडी ४, पिं. सराई ११, जांभरून ४, कोलवड २, ईरला ४, ढालसावंगी ३, पाडळी ६, मासरुळ ७, मोताळा शहर ३, जयपूर ५, धा. बढे ५, घुस्सर १३, खामगांव शहर ६४, खामगांव तालुका आडगाव ६, शेगांव शहर ५, शेगांव तालुका पहुरजिरा १, चिखली शहर २९, चिखली तालुका मेरा बु ६, सवणा ३, डोंगर शेवली २, मलकापूर शहर ८ , मलकापूर तालुका उमाळी ५, धरणगाव ८, हिंगणा काझी ७, अनुराबाद ११, नरवेल ४, दसरखेड ७, कुंड ४ दे. राजा शहर १९, सिनगांव जहा ३, पांगरी ३, गव्हाण ५, दे. मही २, बामखेड ६, गुंजाळा २, पिंपलखुटा ३, सिं. राजा शहर १३, सिं. राजा तालुका केशवशिवणी २, हनवतखेड ४, दरेगांव १५, साखर खर्डा ६, पिंपरखेड ४,  मेहकर शहर ८०, हिवरा आश्रम ५, भालेगांव ६, दे. माळी ७, शेंदला ४, परतापूर ३, ब्रम्हपूरी ३, कल्याणा ५, डोणगांव ८, विश्वी ३, गोहेगांव ४, अंजनी ३, कळमेश्वर १३, वरवंड ३, पाथर्डी ३, लोणी २, वडगाव माळी ५, संग्रामपूर शहर : १, संग्रामपूर तालुका : बिलखेड १, वसाडी १, जळगांव जामोद शहर ५, नांदुरा शहर १५, नांदुरा तालुका निमगांव ५, वाडी ५, तरवाडी २, वडाळी ३, अंबोडा ३, पलसोडा ११, टाकारखेड २, पिंपरी आढाव ४ , पोटळी ३, खंडाळा 1, लोन वडी ४, लोणार शहर २, लोणार तालुका पिंपळनेर २, देऊळगांव कोळ ३, बिबी ४, कोयाळी २, चिखला येथील दाेघांचा समावेश आहे़
 

Web Title: Five more killed in Buldana district, 1035 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.