आडगाव राजा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:47 IST2017-08-02T23:46:14+5:302017-08-02T23:47:03+5:30

आडगाव राजा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : जवळच असलेल्या आडगाव राजा येथे ३१ जुलै ते १ आॅगस्टच्या रात्री गावातील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या करून, अंदाजे १५ ते २० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी २ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
आडगाव राजा येथील परिसरात महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या घटना आठ दिवसांपासून सुरू असून, शेतात एकटी महिला जाण्यास भीत आहे. दरम्यान, ३१ जुलैच्या रात्री चोरट्यांनी कृष्णा बाबूराव वाघमारे यांचा मोबाइल किंमत अंदाजे १० ते १२ हजार, ज्ञानेश्वर सैनाजी काळे यांच्या घराचे कुलूप तोडून पेटीतील (संदूक) दहा हजार रुपये काढूुन घेतले. तसेच कडुबा सीताराम चव्हाण, लक्ष्मण होना काळे यांच्या घराची झडती घेतली. अरविंद आसाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडले. १ आॅगस्टच्या रात्रीसुद्धा अमोल कहाळे यांच्या घरातील चांदीच्या १० ते १२ अंगठ्या व एक सोन्याची अंगठी चोरून नेल्याची माहिती अमोल कहाळे यांनी दिली आहे.