शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:02 IST

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला.

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा- अजिंठा मार्गावरील वाहतूक पूणपणे ठप्प झाली होती.     गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुलडाणा - अजिंठा या ५० किलोमिटर मार्गाचे काम सुरु आहे. मात्र महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या मार्गावरुन ये- जा करणाºया  हजारो वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. दतपूर ते अजिंठा दरम्यान संपूर्ण मार्ग खोदलेला आहे. पावसामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाचे आगमन झाले. बुलडाणा  तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडे भरुन वाहू लागले. बुलडाणापासून १२ किलोमिटर अंतरावरील पळसखेड नागोजवळून पैनगंगा नदी वाहते. या मार्गाचे काम सुरु असल्याने नदीवरील जूना पूल तोडण्यात आलेला आहे. तर त्याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळित राहावी याकरिता बाजूने वळण रस्ता तयार करुन नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी केवळ दोनच पाईप टाकण्यात आले. परंतू याठिकाणी पैनगंगा नदीचा प्रवाह जोरात  असतो. असे असतांनासुध्दा ठेकेदाराने हलगर्जी केली. याचाच परिणाम रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे हा पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे  वृत्त लिहेपर्यंत बुलडाणा - अजिंठा मार्गावरील वाहतूक बंद आहे. 

 एनएचएच्या निर्देशाकडे ठेकेदाराचे दुर्लक्षबुलडाणा- अजिंठा मार्गावरील पर्यायी पूलाचे बांधकाम करताना अधिक संख्येत पाईप टाकण्याचे  निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराला दिले होते. परंतू ठेकदाराने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 दोन वर्षापूर्वी दोन जण गेले होते वाहून मागील दोन वर्षापूर्वी याच ठिकाणावरुन बुलडाणा येथील इंदिरा नगर भागातील दोन जण वाहून गेले होते.  पैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह येथे वेगात असतो. सोमवारी पूल वाहून गेला तेंव्हा कुठलेच वाहन पुलावरुन जात नव्हते. अन्यथा मोठी दुघर्टना घडली असती.  आता नवीन पर्यायी पूल बांधतांना नदीचा प्रवाह लक्षात घेण्याची गरज आहे. 

 संपूर्ण मार्ग चिखलमय बुलडाणा- अजिंठा मार्गाचे कंत्राट सुनील हायटेक या कंपनीला मिळाला होता. सदर कंपनीला आॅक्टोंबर २०१७ मध्ये वर्कआॅर्डर देऊन २४ महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. परंतू या कंपनीने अगोदरचे आठ महिने केवळ पाच ते दहा टक्के काम केले. आपल्याकडे काम होणार नाही म्हणून दुसºया दोन कंपन्यांना काम वाटून देण्यात आले. सध्या दत्तपूर ते अजिंठ्यापर्यंत जवळपास ४० किलोमिटरचा मार्ग खोदलेला आहे. त्यावर मुरुम, माती टाकलेली असल्याने जोरदार पाऊस पडल्याने मार्गावर चिखल साचला. परिणामी वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आणि हा चिखलमय मार्ग यातून केंव्हा सुटका मिळते, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदीRainपाऊस