आग विझविताना अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 17:01 IST2021-03-30T17:01:33+5:302021-03-30T17:01:51+5:30
Firefighter dies while extinguishing fire शंकर सदाशिव कोकाटे ( रा. एमआयडीसी) यांना हृदयविकाराचा झटका आला.

आग विझविताना अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आग विझविण्याचे कर्तव्य पार पाडत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी बाळापूर फैल भागात घडली.
शहरातील बाळापूर फैल भागातील चार भंगारच्या दुकानांना सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर अग्नीशमन विभागाने आगविझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, यावेळी अग्निशमन विभागाच्या गाडीवर चालक म्हणून असलेल्या शंकर सदाशिव कोकाटे ( रा. एमआयडीसी) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. भरती करण्यात आल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.