आदिवासींच्या घरांना आग
By Admin | Updated: May 31, 2014 23:56 IST2014-05-31T23:30:39+5:302014-05-31T23:56:01+5:30
मातोळा तालुक्यातील लोणघाट येथे आदिवासींच्या घरांना आग; तीन कु टुंब उघड्यावर.

आदिवासींच्या घरांना आग
कोथळी : मोताळा तालुक्यातील ईब्राहिमपूर ग्रामपंचायत अतंर्गत येणार्या लोणघाट येथील आदिवासी भिल समाजाच्या तीन घरांना शुक्रवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या भीषण आगीत तीन घरांमधील गृहोपयोगी वस्तूसह अन्नधान्य, कोंबड्या, मजुरीची रक्कम व कपडा-लत्ता जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत लोणघाट येथील अनिता ज्ञानेश्वर पवार, मारोती बाळाजी ठाकरे व बाळू मारोती ठाकरे यांच्या घरांच्या टिनपत्र्यासह संसारउपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने हि तिन्हीं कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.