शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग; ४ बैल, १ गोऱ्हा मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:34 IST2018-12-28T15:34:43+5:302018-12-28T15:34:46+5:30
वडशिंगी : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग; ४ बैल, १ गोऱ्हा मृत्यूमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
वडशिंगी : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली.
वडशिंगी येथील किशोर खंडारे यांच्या काजेगाव रस्त्यावरील गोठ्याला आग लागली. यामध्ये खंडारे यांचे ४ बैल, १ गोऱ्हा आगीत मृत्यूमुखी पडला तर २ म्हशी गंभीर जखमी झाल्या. याच गोठ्यात शेती अवजारे, मका, सोयाबीन, ढेप, स्प्रिंकलर पाईप, तुरीचे कुटार इतर कुटार,शेतीसाहित्य, लाकडी दरवाजे, खिडक्या जळून खाक झाले. सदर आग गोठ्याला लागली असल्याचे भागवत राखोंडे यांचे लक्षात आले. त्यांनी शेतकरी खंडारे यांना बोलावून सांगितले. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनशी संपर्क साधून ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जळगाव अग्निशामन दलाशी संपर्क साधला असता जळगाव येथील वाहन नादुरुस्त असल्याने शेगाव व खामगाव येथून अग्निशमन दलाचे वाहनाला पाचारण कणयात आले. पण हे वाहन सकाळी ६ वाजता गावात पोहचल्यापर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे सदर शेतकºयाचे नुकसान कोणी वाचू शकले नाही. आगीची घटना समजताच मंडळ अधिकारी मुंडे, तलाठी सोळंके, मडाखेड पशुवैद्यकीय अधिकारी गव्हारे, विद्युत वितरणचे सहायक अभियंता डुबल आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले.
(वार्ताहर)