मलकापूरात कापड दुकानाला आग; १५ लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:30 IST2018-12-16T16:29:39+5:302018-12-16T16:30:12+5:30
मलकापुर: शहरातील सिनेमा रोडवरील एका रेडीमेड कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे १५ लाख रूपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे.

मलकापूरात कापड दुकानाला आग; १५ लाखाचे नुकसान
मलकापुर: शहरातील सिनेमा रोडवरील एका रेडीमेड कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे १५ लाख रूपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे.
मलकापूर येथे एका रेडिमेड कापड दुकानाला पहाटे तिन वाजता भिषण आग लागली. याबाबतची माहिती अंबिका साडी सेंटरचे संचालक खंडेलवाल यांनी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ, नगरसेवक अनिल गांधी, दुकान मालक जाजु यांना दिली.
यानंतर त्वरित नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, नगरसेवक अनिल गांधी, जावेद कुरेशी नगरपालिकेच्या अग्नीशामक दला सह घटनास्थळी हजर झाले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान या आगीत दुकानातील संपूर्ण ड्रेस मटेरियल जळून पंधरा लाखाच्या जवळपास नुकसान झाले असल्यसाची माहिती दुकान मालकाने दिली आहे. या आगीची झळ आजुबाजुंच्या दुकानांना बसु नये, याकरिता अग्नीशामक दलांच्या वासुदेव भोपळे, सुरजसिंग राजपुत, वाकोडे आदी जवानांनी आग आटोक्यात आणली. शार्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत जाजु याचे मोठे नुकसान झाले आहे.(तालुका प्रतिनीधी)