Fire broke out at shop in malkapur | मलकापूरात दुकानाला आग; २ लाखाचा माल जळून खाक
मलकापूरात दुकानाला आग; २ लाखाचा माल जळून खाक

मलकापूरः येथील बुलढाणा रस्त्यावरील गुजरे इलेक्ट्रीकला अचानक आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ६ वा.घडली. त्यात सुमारे २ लाखाचा माल जळून खाक झाल्याची माहिती असून पालिकेच्या अग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि,येथील बुलढाणा रस्त्यावर गुजरे इलेक्ट्रीक दुकान आहे.आज मंगळवारी सकाळी ६ वाजता सदर दुकानाला आग लागल्याच नागरिकांना आढळून आले.त्यांनी तात्काळ दुकान मालकाला कळविले. शेजारीच राहत असलेले नगराध्यक्ष अँड. हरिश रावळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.आगीचे कारण समोर आले नाही.
मात्र गुजरे इलेक्ट्रीक मधील पंखे,मिक्सर, वाईंंडींग मशिन,मोटारी,कुलर मशीन, असा तब्बल दोन लाखांचा माल जळून खाक झाल्याची माहिती असून पोलिस तपास करित आहेत.(तालुका प्रतिनीधी)


Web Title: Fire broke out at shop in malkapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.