शेगाव रेल्वेस्थानकात मालगाडीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:19 IST2017-10-10T01:18:38+5:302017-10-10T01:19:23+5:30

शेगाव:  शेगाव येथील रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या कोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे  अचानक आग लागण्याची घटना घडली. चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी मागील ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होती.  सकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात  आल्याने अनर्थ टळला.

Fire brigade in Shegaon railway station | शेगाव रेल्वेस्थानकात मालगाडीला आग

शेगाव रेल्वेस्थानकात मालगाडीला आग

ठळक मुद्देकोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे अचानक आग चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होतीसकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव:  शेगाव येथील रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या कोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे  अचानक आग लागण्याची घटना घडली. चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी मागील ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होती.  सकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात  आल्याने अनर्थ टळला. सोमवारी पहाटे ३ च्या  सुमाराला स् थानकावरील काही प्रवाशाच्या हा प्रकार लक्षात आला. उभ्या  असलेल्या मालगाडीच्या ४ बोगीतून धूर निघत असलेला त्यांना  दिसला. त्यांनी स्थानकप्रमुखांना त्याविषयी माहिती दिली. त्यानं तर  सकाळी शेगाव पालिकेच्या अग्निशमन दलाला  दूरध्वनीवरून कळविण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन स् थानकात पोहचले व त्यांनी ही आग विझवली.

Web Title: Fire brigade in Shegaon railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.