गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:11 IST2021-07-22T12:11:26+5:302021-07-22T12:11:34+5:30

Fire in the barn; death of two cattle : रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले.

Fire in the barn; death of two cattle | गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव दत्तापूर: मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर नजीक असलेल्या रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० जुलै रोजी रात्री घडली.
रायपूर येथील कैलास काकडे यांच्या गोठ्याला ही आग लागली होती. त्यांचा सोनार गव्हाण मार्गावर पक्के बांधकाम केलेला गोठा आहे. त्या गोठ्यास ही आग लागली होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतातील कामे आटोपून कैलास काकडे हे पाऊस सुरू असल्याने गुरांचा चारापाणी करून सायंकाळी घरी गेले होते. दरम्यान त्यांच्या गोठ्यानजीक असलेल्या गोठ्याचे मालक संदीप वाहेकर हे रात्री गोठ्यावर गेले असता कैलास काकडे यांच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित त्याची माहिती कैलास काकडे व गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थही त्वरित मदतीसाठी धावले परंतू तोवर आगीने भडका घेतला. त्यात काकडे यांच्या गोठ्यातील दोन गीर गायी आणि शेती उपयोगी दोन अैाषधी फवारणी पंप, स्प्रिंकलर संच, बी-बियाणे, किटकनाशके, मोटार संच, वखर, पेरणी यंत्र व अन्य साहित्य नष्ट झाले.

Web Title: Fire in the barn; death of two cattle