शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

अखेर वादग्रस्त याचिका मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:44 AM

शेगाव : शेगाव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांसंबंधी शहरातील दोन वरिष्ठ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सन २00७ मध्ये एक पत्र पाठविले असता न्यायालयाने त्या पत्रास जनहित याचिका म्हणून स्वीकारले होते; मात्र सदर याचिकेचे संपूर्ण स्वरूप बदलेले असल्याचा कांगावा करीत याचिकाकर्त्यांनी सन २0१७ म्हणजे तब्बल दहा वर्षांनी माघार घेतल्याने त्यांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाबाबत शहरात चर्चा होत आहे. 

ठळक मुद्देदहा वर्षांपूर्वी पाठविलेल्या पत्राला उच्च न्यायालयाने बनविले होते जनहित याचिकाआराखड्यांतर्गत निकृष्ट कामे होत असल्याचा उल्लेख

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांसंबंधी शहरातील दोन वरिष्ठ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सन २00७ मध्ये एक पत्र पाठविले असता न्यायालयाने त्या पत्रास जनहित याचिका म्हणून स्वीकारले होते; मात्र सदर याचिकेचे संपूर्ण स्वरूप बदलेले असल्याचा कांगावा करीत याचिकाकर्त्यांनी सन २0१७ म्हणजे तब्बल दहा वर्षांनी माघार घेतल्याने त्यांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाबाबत शहरात चर्चा होत आहे. शहरातील आनंदीलाल भुतडा व सुरेश जयपुरीया या दोन वरिष्ठ नागरिकांनी १५ फेब्रुवारी २00७ रोजी शहरातील खड्डय़ांसंबंधी उच्च न्यायालय नागपूर यांना लिहिलेल्या पत्रास जनहित याचिका म्हणून स्वीकारल्यानंतर याच जनहित याचिकेमध्ये नागपूर येथील पत्रकार मंगेश इंद्रपवार आणि काही लोक जोडल्या गेल्याने याचिकेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत गेले व त्यामध्ये शहरातील अनेक समस्या घालण्यात आल्या.  संत गजानन महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त सन २00९ मध्ये आराखड्यास मंजुरात मिळाली. यानंतर सन २0१0 मध्ये आराखड्याच्या कामासही सुरुवात झाली. सुरुवातीला ३६0 कोटी रुपयांचा आराखडा ५00 कोटींपर्यंत येऊन ठेपला. दरम्यान,  मातंगपुरा ही वस्ती ५ मे २0१७ रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये शासनाची जागा सोडून ४0 कुटुंबे राहत असलेल्या त्यांच्या मालकीच्या घरांनासुद्धा जमीनदोस्त करण्यात आले. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला चुकीची माहिती पुरविल्याने सदर घरे पाडल्या गेली व याचिकाकर्ते म्हणून आनंदीलाल भुतडा यांचे नाव समोर आल्याने शहरातील नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. या गोष्टीचा पश्‍चात्ताप झाल्याने आनंदीलाल भुतडा व सुरेश जयपुरीया या दोन्ही याचिकाकर्त्यांनी २ ऑगस्ट २0१७ रोजी न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर, यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे, की जवळपास ४५0 कोटी रु. खर्च झाल्यानंतरसुद्धा येणार्‍या भाविकांना पुरेसा लाभ मिळत नाही. शेगाव रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर उतरल्यानंतर गजानन महाराज मंदिरापर्यंत भाविकांना विशेषकरून महिला भाविकांना रस्त्यात दोनच सुलभ शौचालये आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. एकही शासकीय यात्री निवासस्थान बनविण्यात आले नाही, शेगाव विकास आराखडा का जरुरी आहे, याचे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. वर्षाच्या ३६0 दिवसांत शहरात किती वाहने येतात, याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही डाटा बनविलेला नाही किंवा आजपर्यंत वाहनांची मोजणीसुद्धा करण्यात आलेली नाही. आमच्या अंदाजाप्रमाणे वर्षातून ५0 दिवस असे आहेत, ज्या दिवशी वाहनांची संख्या वाढते व यावेळी कार पार्किंगची आवश्यकता भासते. या वाहनतळाकरिता जुने कॉटन मार्केटची जागा उपयुक्त आहे; मात्र त्याला अधिग्रहित न करता रहिवासी असलेली खळवाडीची जागा अधिग्रहित केल्या जात आहे. आम्ही दोघेही वरिष्ठ नागरिक असल्याने व जमीन अधिग्रहित करण्याच्या कारणावरून लोकांची तीव्र नाराजी आमच्यावर आह, तसेच प्रेसमध्ये डब्ल्यूपी ५८५६/0७ आनंदीलाल भुतडा यांचे नाव येते. या कारणाने सामान्य जनता आम्हाला उचकणे देत असते. तुमच्यामुळेच आमचे घर उजाड होत आहे, असेही म्हणतात. या वयामध्ये हे ऐकण्याची आमची मानसिकता नाही. त्यात आनंदीलाल भुतडा यांची बायपास सर्जरी झालेली आहे, तसेच किती दर्शनार्थी दररोज श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात, याचासुद्धा अचूक आकडा नाही किंवा कोणतेही वैज्ञानिक मोजमाप नाही. शेगाव विकास आराखड्यात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे, असेसुद्धा त्यांच्या या पत्रात नमूद केलेले आहे.-