अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:27 PM2020-10-05T19:27:19+5:302020-10-05T19:27:48+5:30

online exam schedule १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.

Final year online exam schedule announced | अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next

१२ आॅक्टोबरपासून सुरू होणार परीक्षा
बुलडाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष/ सत्राच्या ऑनलाईन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ५ ऑक्टोबर पासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. त्यानुसार वेळापत्रही जाहीर करण्यात आले होते. मात्र,  शिक्षकेतर कर्मचाºयांच्या संपामुळे  विद्यापीठाला जाहीर केलेले वेळापत्रक रद्द करावे लागले होते. शिक्षकेतर कर्मचाºयांचा संप मिटल्यानंतर विद्यापीठाने नव्याने आॅनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केला आहे. या परीक्षा ऑनलाईनच होणार असून विद्यार्थ्यांना मोबाईलवरूनही देता येणार आहे. परीक्षांविषयी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परीक्षा व नियोजन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख यांनी ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताऑनलाईन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.

Web Title: Final year online exam schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app