सात आरोपींविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 14, 2014 00:50 IST2014-09-14T00:50:47+5:302014-09-14T00:50:47+5:30
नांदुरा तालुक्यातील माळेगाव येथे जातीवाचक शिवीगाळ.

सात आरोपींविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदुरा : जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द अँक्ट्रासिटी अँ क्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना तालुक्यातील ग्राम माळेगाव गोंड येथे घडली.
याबाबत आकाश भास्कर वाकोडे वय १६ वर्षे धंदा शिक्षण रा. माळेगाव गोंड याने पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ९ सप्टेंबरच्या रात्री गावातून घराकडे जात असताना बळीराम केशव गोंड, मुकेश्वर डिगांबर गोंड, सोलया गजानन गोंड, राहुल हरिहर गोंड व शशिकांत गोंड यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मला म्हटले की तुमच्या समाजातील मुलाने आमच्या समाजातील मुलीशी सहा महिन्यापूर्वी पळवून नेवून लग्न केले . असे म्हणत मला लाता बुक्यांनी मारहाण केली.
या तक्रारीवरुन वरील सात आरोपीविरुध्द अप नं. ११७/१४ कलम १४३, ३२३, ५0६ भादंवि कलम ३ (१) १0 अ.जा. ज.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्यापपर्यंंत अटक करण्यात आली नाही. तपास डीवायएसपी पाटील करीत आहेत.