परस्पर विरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:11+5:302021-09-17T04:41:11+5:30
१५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजे दरम्यान फिर्यादी पवन लक्ष्मण बनकर याच्या भावास शिवीगाळ करून डोक्यावर लोखंडी रॉड मारून ...

परस्पर विरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल
१५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजे दरम्यान फिर्यादी पवन लक्ष्मण बनकर याच्या भावास शिवीगाळ करून डोक्यावर लोखंडी रॉड मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपी संतोष किसन जोशी, अमोल किसन जोशी, किसन जोशी, कासाबाई किसन जोशी यांचे विरोधात गुन्हा दाखल केला. तर याचवेळी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अमोल लक्ष्मण मतकर, पवन लक्ष्मण मतकर (रा.देऊळगाव मही) यांच्याविरोधात फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना शिट्टी वाजवून वाईट उद्देशाने महिलेचा हात धरला व या महिलेच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरोधात १६ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली अकील काझी हे करीत आहेत.