सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 19:36 IST2021-06-21T19:36:07+5:302021-06-21T19:36:16+5:30

Filed a case against the Money lender : कर्जाची परतफेड करूनही शेती नावाने न करणाऱ्या मेहकर येथील सावकाराविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी २१ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे़.

Filed a case against the Money lender | सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

डोणगांव : कर्जाची परतफेड करूनही शेती नावाने न करणाऱ्या मेहकर येथील सावकाराविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी २१ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे़.
डाेणगाव येथून जवळच असलेल्या लोणीगवळी येथील सखाराम शंकरराव काळदाते यांनी अर्थीक अडचणी पोटी मेहकर येथील राजपूत गल्लीत राहणारे गजानन रामचंद्र गायकवाड यांच्या कडून व्याजाने पैसे घेतले हाेते़ गहान म्हणून त्यांच्या कडील गट क्रमांक २१० मधील १ हेक्टर२० आर जमीन अटकाव खरेदी करून दिली होती़. ही घटना ६ मे २०१७ पुर्वी घडली होती़ त्यानंतर सखाराम काळदाते याने व्याजासह रक्कम परतफेड करून सुध्दा आरोपी गायकवाड याने जमीन शेतकऱ्याच्या नावाने करून दिली नाही़. त्यामुळे प्रभारी सहाय्यक निबंधक गजानन रामेश्वर फाटे यांच्या तक्रारीवरून डोणगांव पोलीसांनी आरोपी गजानन रामचंद्र गायकवाड विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास पि. एस आय शिवाजी राठोड करीत आहेत.

Web Title: Filed a case against the Money lender