अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 00:08 IST2017-07-04T00:08:30+5:302017-07-04T00:08:30+5:30

अकोला येथील सावकाराची शेगावात अवैध सावकारी

Filed Against Illegal Savarkar | अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : अकोला येथील शिवकुमार श्रीराम अग्रवाल या अवैध सावकाराविरुद्ध सहायक निबंधक यांचे फिर्यादीवरून शेगावात सावकारी अधिनियमांतर्गत ३ जुलै रोजी ग्रामीण पो.स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील ग्राम गौलखेड येथील भानुदास श्रीकृष्ण शेजोळे यांचे जमीन खरेदी प्रकरणात शिवकुमार श्रीराम अग्रवाल, रा.रणपिसे नगर अकोला याने १०/५/२०१६ पूर्वी २ लाख रुपयाचा व्यवसाय केला आहे, असे उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याप्रकरणी अनिल विठ्ठल भोयर, सहा.निबंधक सहकारी संस्था, शेगाव यांनी उपजिल्हा निबंधक, बुलडाणा यांचा आदेश २४५५/१६ अन्वये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी शिवकुमार श्रीराम अग्रवाल यांचे विरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सपोनि. मंगला वाकडे या करीत आहेत.

Web Title: Filed Against Illegal Savarkar