मध्यप्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By Admin | Updated: June 8, 2017 15:33 IST2017-06-08T15:33:52+5:302017-06-08T15:33:52+5:30

युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसने केली राष्टÑपतींकडे मागणी

File a criminal case against the Madhya Pradesh government | मध्यप्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मध्यप्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसने केली राष्ट्रपतींकडे मागणी
मोताळा : मध्यप्रदेश सरकारने गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या घडविली
असल्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बुलडाणा
युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली
आहे.
सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकऱ्याला अनेक अडचणीचा सामना करावा
लागत आहे. कर्जमुक्तीसाठी मध्यप्रदेशात आंदोलन करित असणाऱ्या शेतकऱ्यांवर
अमानुष गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ६ शेतकरी गतप्राण झाले. या
गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेस व मोताळा
तालुका काँग्रेसकडून मोताळा बसस्थानक चौकात मेणबत्ती लावून श्रध्दांजली
देण्यात आली.
त्यानंतर युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसकडून मोताळा तहसिलदारांमार्फत
राष्ट्रपती  यांना निवेदन देवून मध्य प्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर मोताळा तालुका
अध्यक्ष अनिल खाकरे, काँग्रेस नेते एकनाथ खर्चे, युवक काँग्रेसचे इरफान
पठाण, विजयसिंग राजपूत, जि.प.सदस्य, महिंद्रा गवई, राजेश गवई, मिलिंद
अहिरे, ताराबाई शिंबरे, उर्मिला अवचार, निर्मला राठे, अनंत देशमुख,
विक्रम देशमुख यांच्यासह निवेदनावर अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: File a criminal case against the Madhya Pradesh government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.