शेताच्या बांधावरून दाेन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:58+5:302021-06-27T04:22:58+5:30

डावरगाव येथील सोळंकी आणि खरात कुटुंबात अनेक वर्षांपासून शेतीचा वाद आहे. २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सुदाम रामभाऊ ...

Fighting in Daen groups over farm embankment | शेताच्या बांधावरून दाेन गटांत हाणामारी

शेताच्या बांधावरून दाेन गटांत हाणामारी

डावरगाव येथील सोळंकी आणि खरात कुटुंबात अनेक वर्षांपासून शेतीचा वाद आहे. २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सुदाम रामभाऊ खरात, कारभारी रामभाऊ खरात, रामेश्वर रामभाऊ कारभारी खरात यांनी बाळासाहेब सोळंकी यांच्या घरावर हल्ला करून, बाळासाहेब यांच्यासह गजानन बाळासाहेब सोळंकी, स्वाती गजानन सोळंकी, प्रकाश बाळासाहेब सोळंकी, बेबी बाळासाहेब सोळंकी, मंदा प्रकाश सोळंकी यांना जबर मारहाण केली. यातील गजानन, प्रकाश व बाळासाहेब सोळंकी हे तिघे जबर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी जालना येथील दवाखान्यात हलविण्यात आले होते. यापैकी गजानन व प्रकाश यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने, त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे, तर बाळासाहेब सोळंकी अजूनही उपचार घेत आहेत. या प्रकरणी मंदा प्रकाश सोळंकी यांच्या फिर्यादीवरून सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात सुदाम रामभाऊ खरात व इतर सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात संजय डोंगरदिवे व संजय काकड हे तपास करीत आहेत.

Web Title: Fighting in Daen groups over farm embankment