आर्थिक विवंचनेत शेतक-यांची भाऊबीज!
By Admin | Updated: October 25, 2014 23:50 IST2014-10-25T23:50:37+5:302014-10-25T23:50:37+5:30
सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके बुडालीत, कापूस अद्याप न आल्याने शेतक-यांची दिवाळी अंधारातच.
_ns.jpg)
आर्थिक विवंचनेत शेतक-यांची भाऊबीज!
बुलडाणा : दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता सणाला विशेष महत्त्व राहिले नाही. रोजचीच दिवाळी आणि दसरा असे मोठे मन करून सर्वसामान्य माणूस सणासुदीला सामोरे जात आहे. सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले. या दिवाळीत शेतकर्यांना आनंद साजरा करता आला नाही. भाऊबीजेला घरी आलेल्या बहिणीची सरबराई करण्याचीही ऐपत शेतकरी भावाजवळ राहिली नाही. उशिरा आलेल्या पावसाने पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच शेतकर्यांना नगदीचे उत्पन्न देणारे सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके ऐन भरात असताना पावसाने उघाड दिल्याने कोमेजून उत् पन्नात प्रचंड घट झाली. परिणामी दिवाळी सणाला शेतकर्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे यावर्षीची दिवाळी आर्थिक विवंचनेतच गेली. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार उधारीवर केले जातात. यामध्ये किराणा मालापासून तर कापड दुकानदाराचा समावेश असतो. खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर त्यातून मिळणार्या उत्पन्नापासून दिवाळीपूर्वी जुनी उधारी चुकती करून नवीन व्यवहाराला सुरुवात केली जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकर्यावर सातत्याने अस्मानी व सुलतानी संकट ओढवल्या जात आहे. कधी नापिकी, तर कधी अतवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडी आलेला घास हिसकावल्या जात आहे. त्यामुळे दुकानदार व सावकाराची उधारी शेतकरी चुकता करू शकले नाही. यावर्षी बर्यापैकी सोयाबीनने साथ दिली होती; मात्र ऐन शेंगा भरण्याच्यावेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे दाणे भरले नाही व झडती कमी झाली. त्यामुळे एकरी उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.