युवकांची फसवणूक

By Admin | Updated: June 4, 2014 23:50 IST2014-06-04T23:41:32+5:302014-06-04T23:50:06+5:30

नोकरीचे आमिष दाखवुन सिंदखेडराजा तालुक्यातील युवकांची फसवणुक; आरोपीस अटक.

Females of the youth | युवकांची फसवणूक

युवकांची फसवणूक

सिंदखेडराजा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुन दोन युवकांना गंडविणार्‍या एका शिक्षकास साखरखेर्डा पोलीसांनीअटक केली आहे. न्यायालयात उभे केले असता आरो पीस पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरेगाव येथील रामकिसन कारभारी चाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून झोटींगा येथील नागपूर येथे स्थायिक असलेला संजय कारभारी डिघोळे हा शिक्षक नागपूर येथे राहतो. रामकिसन यांचा मुलगा दिपक आणि शिवाजी काकड यांचा मुलगा पंढरी हे दोघे डी.एड. शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात होते. ही बाब डिघोळे यांनी हेरुन चाटे यांचेशी संपर्क साधला. तसेच मुलाला शासकीय आदीवासी आश्रम शाळेत लावून देतो, म्हणून आमिष दाखविले. त्यासाठी प्रत्येकी ७ लाख ५0 हजार रुपयांची बोलणी झाली. त्यापैकी प्रत्येकी तीन-तीन लाख मला द्यावे. मी ते अधिकार्‍यांपर्यंत पोहचवितो व नोकरीचा आदेश काढतो, असे सांगून सन २0११ साली पंचासमक्ष चार लाख त्याने घेतले. त्यानं तर सतत नोकरी विषयी चौकशी केली असता संजय डिघोळे याने पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. तीही पूर्ण केली. परंतु आपण पूर्णपणे फसल्या गेलो याची चाहूल लागताच रामकिसन कारभारी चाटे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये २७ मे रोजी तक्रार दाखल केली. आरोपी संजय डिघोळे यास अटक करुन कलम ४२0, ४0६ भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Females of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.