Father kills son over domestic dispute | घरगुती वादातून पित्याने केला मुलाचा खून

घरगुती वादातून पित्याने केला मुलाचा खून

ठळक मुद्देआरोपी पिता महाकालसिंग चव्हाण (५७) याला अटक केली.महाकालसिंग यांनी हिरालालच्या डोक्यात दगड मारला.

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : घरगुती वादातून पित्याने मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा येथे सोमवारी घडली. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल केला. 
आरोपी पिता महाकालसिंग चव्हाण (५७) याला अटक केली.  ग्राम भिंगारा येथील रहिवाशी रायजाबाई हिरालाल चव्हाण (२७) या महिलेने जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.  २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास  हिरालाल  चव्हाण व महाकालसिंग  चव्हाण या पिता-पुत्रामध्ये वाद झाला. राग अनावर झाल्याने महाकालसिंग यांनी हिरालालच्या डोक्यात दगड मारला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

Web Title: Father kills son over domestic dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.