मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी
By विवेक चांदुरकर | Updated: October 16, 2022 13:17 IST2022-10-16T13:17:36+5:302022-10-16T13:17:44+5:30
मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते

मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी
मलकापूर (जि. बुलढाणा) : मालवाहतूक करणारे वाहन दुभाजकावर आदळून उलटल्याने ९ शेतमजूर जखमी झाल्याची घटना मलकापूर-बुलढाणा मार्गावर विघ्नहर्ता रुग्णालयासमोर रविवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली.
मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले. अपघातात नंदीनी अमोल वानखेडे (वय १४ वर्षे), अनुष्का सिताराम भोलवनकर (वय १५ वर्षे), वैष्णवी सिताराम भोलवनकर (वय १७), निर्मला सुभाष भोलवनकर (वय ४८), अभय अमोल वानखेडे (वय १६), संध्या विजय झनके (वय ३२), प्रमिला सुखदेव भोलवनकर (वय ६५), मुक्ताबाई गजानन निशाणकर (वय २४), सिंधूबाई केशव भोलवनकर (वय ६०) जखमी झाले.
दरम्यान, अपघातानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निर्मला सुभाष भोलवनकर व सिंधूबाई केशव भोलवनकर या दोघींना प्रकृती खालावल्याने बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.