थकित मजुरीसाठी उपोषण

By Admin | Updated: July 25, 2014 00:04 IST2014-07-25T00:04:31+5:302014-07-25T00:04:31+5:30

रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणार्‍या कामगारांचे गेल्या मार्च महिन्यापासून मजुरी थकल्याने कामगारांनी उपोषण केले.

Fasting for tired labor | थकित मजुरीसाठी उपोषण

थकित मजुरीसाठी उपोषण

खामगाव : रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणार्‍या कामगारांचे गेल्या मार्च महिन्यापासून मजुरी थकल्याने कामगारांनी २४ जुलै रोजी स्थानिक सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले. खामगाव तालुक्याच्या रोजगार हमी योजनेंतर्गत कामगार काम करीत आहेत. मात्र गेल्या मार्च महिन्यातील तसेच ११ जून ते २४ जून पर्यंत कामे करूनही मजुरांचे मस्टर निघाले नाही. त्याचप्रमाणे चालू जुलै महिन्यातील कामगारांच्या मस्टरबाबत काहीच कार्यवाही नसल्याने आज वनकामगार संघटनेच्यावतीने येथील लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले. याबाबत लागवड अधिकारी पी.के. काळुसे यांनी सामाजिक वनीकरणकडून मजुरांच्या उपस्थिती नोंदण्याकरीता ई मस्टर्सचे मागणीपत्र तहसील कार्यालयाला सादर केले. मात्र तहसील कार्यालयाकडून वेळेवर या बाबींना उशीर होत असल्याने मजुरांच्या पगाराबाबत अडचणी येत असल्याची माहिती दिली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार ए.एन. टेंभरे यांनी उपोषणकर्त्यांंची भेट घेवून थकलेली मजुरी लवकरच कामगारांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. उपोषणात वनकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अंभोरे, अरविंद ठोसरे, पांडुरंग शेळके, मनोहर पिंगळे, प्रल्हाद भिसे, परशराम गावंडे, अशोक हिवराळे, प्रकाश हिवराळे यांचा समावेश होता. 

Web Title: Fasting for tired labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.