मनसेचे खामगाव पालिकेसमोर बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:20 IST2018-09-03T15:20:10+5:302018-09-03T15:20:22+5:30
खामगाव : शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनसे शहर सचिव सोमवारी पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

मनसेचे खामगाव पालिकेसमोर बेमुदत उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनसे शहर सचिव सोमवारी पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
खामगाव नगर पालिकेसमोरील खुली जागा पेट्रोलपंप धारकास लीजवर देण्यात आली आहे. या जागेवर शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशी रात्रंदिवस मोठ्याप्रमाणात बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार मनसेचे आनंद गायगोळ यांनी केली होती. यासंदर्भात पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देवून अवैध बांधकाम धारकांवर कारवाई करावी, अन्यथा पालिकेत तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला होता. दरम्यान, पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे मनसेने बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे..