फार्महाऊसमधील जुगारावर छापा, दहा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:01+5:302021-03-14T04:31:01+5:30
जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे, जुगाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ...

फार्महाऊसमधील जुगारावर छापा, दहा आरोपींना अटक
जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे, जुगाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या नेतृत्वात एक पथक गठीत केले आहे. या पथकास जामोद येथील एका फार्महाऊसवर मोठा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर या पथकाने तेथे छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये रमेश गोविंदा हागे (वय ३५), राजू सत्यनारायण जोशी (४४), सुरेश शंकर भड (३८), सय्यद बिलाल सय्यद कदीर (३२), मधुकर शेषराव दुरडे (२६), काद खाँ मोहम्मद खाँ (३०), सबीरोद्दीन हसिमोद्दीन (३०), राजू गोपाल हागे (३०), राजू महादेव हागे (३५, सर्व रा. जामोद) यांच्यासह जळगाव जामोद येथील सय्यद निजाम सय्यद उस्मान (५४) यांना अटक केली. रमेश गोविंदा हागे यांच्या शेतशिवारातील फार्महाऊसमध्ये हा जुगार सुरू होता. या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख ५९ हजार ६०० रुपये, पाच दुचाकींसह २ लाख ५४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अमलदार शेख साजीद, युवराज मुळे, संजय नागवे, वैभव मगर, सहाय्यक फौजदार सुभाष वाघमारे, सुधाकर बर्डे यांनी केली. मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जुगाराचे चांगलेच लोण आले आहे. त्यानुषंगाने सक्रिय असलेल्या या पथकाने अलीकडील काळात कारवाईचा धडाका लावला आहे.