शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मंत्रालयात जाळ्या लावून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:53 AM

वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकिडनी आजाराच्या रुग्णांकडे शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.  या आजाराने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत द्यावी,  अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

भाजपा सरकार  विकासांच्या गप्पा मारून जनतेला उल्लू बनवित असून शासन शेतकरी  सर्वसामान्य विरोधी धोरण राबवित आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर  येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.  संग्रामपूर तालुक्यात झंझावाती दौरा करून खारपाणपट्टा ढवळून काढला. या  दौर्‍याला तरुणांचा व शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणावर टीका करीत खारपाणपट्टय़ातील नागरिकांचे  किडनीच्या आजाराने मृत्यू होत असताना, विकासाच्या गप्पा करणारे भाजप  सरकार साधे स्वच्छ पाणी नागरिकांना देऊ शकत नाही? एकीकडे सरकार  मोठय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेऊन शेतकर्‍यांना देशोधडीला  लावत आहे तर दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवत नाही. गेल्या अनेक वर्षां पासून या भागातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. त्यामुळे किडनीचे  आजार होऊन लोक मृत्युमुखी पडत असताना स्वच्छ व पुरेसे पाणी ही  सरकार देऊ शकत नाही. अहो माणसच शिल्लक उरले नाही तर काय  करायचा तुमचा विकास, असा सवाल उपस्थित करून तुपकर म्हणाले की,  १४0 गाव पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्णत्वास नेऊन खारपाणपट्टय़ातील  नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करावा. किडनीच्या आजाराने मृत्यू  झालेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना किमान २ लाख रुपयांची आर्थिक मदत  करावी. सिंचन प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना तातडीने योग्य  मोबदला द्यावा. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन कुटुंबातील एका  व्यक्तीला शासकीय सेवेत समावून घ्यावे या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास  खारपाणपट्टय़ातील नागरिकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे  आंदोलन उभे करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. तुपकर यांनी  मोमीनाबाद, काकनवाडा बु., काकनवाडा खु., खिरोडा, पिंप्रीमाळेगाव,  एकलारा, उमरा, लाडणापूर, सोनाळा, सगोडा, वडगाव, कोनद, काटेल,  पलसोडा, रिंगणवाडी, पंचाळा, काकोडा, बावनबीर या गावांचा दौरा करून  समस्या जाणून घेतल्या. 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या