नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 00:18 IST2016-01-28T00:18:10+5:302016-01-28T00:18:10+5:30
नापिकीला कंटाळून घेतला गळफास.

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
वडशिंगी(जि. बुलडाणा) : येथील शेतकरी रामदास भास्कर गावंडे वय ४८ वर्षे यांनी २१ जानेवारी रोजी वडशिंगी आसलगाव रस्त्याचे खोल वाटेमध्ये एका निंबाच्या झाडाला गफळास घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकर्याकडे दीड एक्कर शेती आहे. दुष्काळी स्थितीमुळे झालेल्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, आई-वडील, पत्नी असा परिवार आहे.