शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:53 IST2018-07-30T16:52:01+5:302018-07-30T16:53:51+5:30
खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील गोपाल उर्फ सुरूश तुकाराम धोटे (वय ५०) या शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील गोपाल उर्फ सुरूश तुकाराम धोटे (वय ५०) या शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक शेतकरी गोपाल धोटे यांच्याजवळ १३ एकर शेती आहे. त्यांनी शेतीवर महाराष्ट्र बँकेच्या माटरगाव येथील शाखेतून १ लाख १८ हजार रूपयांचे कर्ज काढले होते, अशी माहिती मृतक शेतकºयाचे मावसभाऊ गजानन प्रल्हाद धंदर यांनी दिली. गोपाल धोटे हे सोमवारी सकाळी शालीग्राम धुमाळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी असली तरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्या थांबता थांबेनात. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखणे हे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
(प्रतिनिधी)