बुलडाणा जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: April 11, 2017 02:08 IST2017-04-11T02:08:39+5:302017-04-11T02:08:39+5:30

कर्जबाजारीपणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील पारखेड येथील शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ एप्रिल रोजीच्या रात्री घडली.

Farmer's Suicide in Buldana District | बुलडाणा जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

बुलडाणा जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

जानेफळ (जि. बुलडाणा): कर्जबाजारीपणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील पारखेड येथील शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ एप्रिल रोजीच्या रात्री घडली. उल्हास भावसिंग जाधव (४२) असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. मृत शेतकर्‍याकडे दोन एकर शेती असून, त्याच्यावर जानेफळ येथील भारतीय स्टेट बँकेचे ४0 हजार रुपये कर्ज होते. तसेच त्याच्यावर खासगी सावकाराचे कर्ज असल्यामुळे विपन्नावस्थेत असलेल्या उल्हास जाधव यांनी त्यांच्या शेतातील मांडवाला दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृत शेतकर्‍याच्या पश्‍चात पत्नी, २ मुली व १ मुलगा असा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmer's Suicide in Buldana District