शेतक-यांनी फिरवला मका पिकावर नांगर

By Admin | Updated: July 26, 2016 01:55 IST2016-07-26T01:55:39+5:302016-07-26T01:55:39+5:30

कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात.

Farmers scramble on maize crop rotated by farmers | शेतक-यांनी फिरवला मका पिकावर नांगर

शेतक-यांनी फिरवला मका पिकावर नांगर

नागेश मोहिते / धाड (जि. बुलडाणा)
गेल्या तीन-चार वर्षांंपासून सतत पडणार्‍या दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाने दिलासा दिला असला तरीही सध्या बुलडाणा तालुक्यात मका पिकावर मोठय़ा प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वत्र मका पीक हळदीसारखे पिवळे पडून त्याची वाढ खुंटल्याचे जाणवत असल्याने शेतकर्‍यांनी मका पिकात नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे.
मागील वर्षी अवर्षण असल्याने आणि कपाशीसारखे नगदी पीक फेल ठरल्याने यावर्षी चारावर्गीय असणारे मका पीक लागवडीस शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे मका पीक सध्या बहुत खर्चीक पडत आहे. तालुक्यात कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार मका पिकाची लागवड ही ३ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर आहे. तर चार्‍यासाठी मका पेरणी ही १८२ हेक्टर क्षेत्रावर केल्या गेली आहे. धाड परिसरात यावर्षी कपाशी पेरणी घटून मका लागवडीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या परिसरात सर्वत्र मका पीक हे पिवळे पडले आहे. परिणामी या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्‍यांनी आपल्या पद्धतीत सर्व उपाय करूनदेखील मक्याची वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे सदर पीक खराब होत असल्याने या भागात काही शेतकर्‍यांनी सर्रास उभे मका पीक वखरून दुसरे पीक पेरले आहे. नैसर्गिक आपत्तीतून होरपळून निघणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पिकांवर रोगराईमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरूड येथील शेतकरी शे. मुजीब शे. वाहेद रा. वरूड (रंगाप्पा) या शेतकर्‍याने आपल्या ४ एकर शेतात मका पिकाची लागवड केली. त्यांचे सर्व मका पीक पिवळे पडले असून साधारण एक एकर मका वाढ खुंटल्यासारखा होऊन त्यांनी विविध औषधी, खतांची फवारणी केली मात्र सुधारणा झाली नाही. परिणामी नाइलाजास्तव त्यांनी शेतातील उभी मका वखरून टाकली, असा प्रकार हा बहुतेक या भागात झाला आहे.

Web Title: Farmers scramble on maize crop rotated by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.