Farmers now exercise for rabi crop loans | शेतकऱ्यांची  आता रब्बी पीक कर्जासाठी कसरत

शेतकऱ्यांची  आता रब्बी पीक कर्जासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता असून दीड लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खरीप हंगामात कर्जमाफी न मिळाल्याने पीक कर्जाचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.
दरम्यान कर्जमाफी न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी सद्या त्रस्त आहेत. आधार प्रमाणिकरण केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पुन्हा आधार प्रमाणिकरण करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची पिककर्जाची कसरत रब्बीतही आहेच. एकूण उदिष्ठाच्या ४० टक्के टक्के शेतकºयांना खरीपात पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. गेल्या चार ते पाच वर्षात महत्त्मस्तरावर शेतकºयांना खरीपाचे पीक कर्ज वाटप झाले असले तरी अनेक शेतकºयांना प्रत्यक्षात कर्जमाफीमधील तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज मिळाले नव्हते. अशांना येत्या काळात कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे अशा शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.
३० सप्टेंबर रोजी खरीपाच्या पीक कर्जाची मुदत संपली असून एक आॅक्टोबर पासून रब्बीसाठी पीक कर्ज उपलब्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान ३१ डिसेंबर पर्यंत रब्बीसाठी पीक कर्ज वाटप करता येणार आहे. त्यासाठी यावर्षी ४० हजार ३१४ शेतकºयांना रब्बी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ बँकांना देण्यात आले असून २७३ कोटी ३७ लाख रुपयापर्यंत रब्बीसाठी पीक कर्ज देण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात २०१३ नंतर २०१९ आणि आता २०२० मध्ये चांगला पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात कृषी विभागाच्या नियोजनापेक्षाही अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेने हालचाली सुरू केल्या असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

Web Title: Farmers now exercise for rabi crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.