शेतक-यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:40 IST2017-08-02T23:38:58+5:302017-08-02T23:40:44+5:30

Farmer's life stuck! | शेतक-यांचा जीव टांगणीला!

शेतक-यांचा जीव टांगणीला!

ठळक मुद्देगत तीन आठवड्यांपासून पावसाची दडीगतवर्षीच्या तुलनेत फक्त दोन-तृतीयांश पाऊसगतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस






लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत तीन आठवड्यांपासून पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाची प्रचंड अनियमितता दिसून येत असून, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकºयांवर अस्मानी संकटाचे सावट दिसून येत आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी पेरणीची घाई केली; परंतु यानंतर पाऊस बरेच दिवस गायब झाला. त्यामुळे अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांच्या रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. पण, यानंतरही पावसाची अनियमितता सुरूच आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला बºयापैकी हजेरी लावणाºया पावसाने नंतर मात्र पुन्हा एकदा दडी मारली. जवळपास तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात पिके आॅक्सिजनवर असून, शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. शेतकरी चातकाप्रमाणे डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहत आहेत.
चालू आठवड्यात पाऊस आला तरच पिकांची स्थिती चांगली सुधारेल; अन्यथा पिकांना फटका बसणार आहे. पावसाच्या आकडेवारीचा तुलनात्मकदृष्ट्या विचार केला असता, यावर्षी आतापर्यंत झालेला पाऊस गतवर्षीच्या तुलनेत फक्त दोन- तृतीयांश असून, एक- तृतीयांश पाऊस गतवर्षीपेक्षा कमी आहे. घाटाखालील सर्वच तालुक्यात जवळपास अशीच स्थिती आहे.

Web Title: Farmer's life stuck!