शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:25 IST

मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे

मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.   तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील सोमनाथ हाके यांचे शेत कोथळी शिवारात आहे. त्यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरु आहे. त्यामुळे शेतात अनेक मजूर काम करीत होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोमनाथ हाके मजुरांसाठी पिण्याचे पाणी आणण्याकरिता शेतातील विहिरीवर गेले होते. त्याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. शेतकºयाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतातील मजूर मदतीसाठी धावले. त्यामुळे अस्वलाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत सोमनाथ हाके यांना मोताळा व त्यानंतर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  अस्वल लपले केळीच्या शेतातशेतकरी सोमनाथ हाके यांच्यावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरुन पळालेले अस्वल शेजारच्या केळीच्या शेतात लपून बसले आहे. शेतकºयांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. मोताळा आरएफओ कोंडावार आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथून रेस्क्यू टीमला बोलावून घेतले. या टीमचे सदस्य राहुल चौहान, सुधीर जगताप, संदीप मडावी, देविदास वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अस्वल केळीच्या शेतात लपून बसलेले दिसले.      (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीवMotalaमोताळाFarmerशेतकरी