रस्त्यासाठी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:26 IST2018-06-19T17:26:09+5:302018-06-19T17:26:09+5:30
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

रस्त्यासाठी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपोषण
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पिंपळगाव उंडा ता.मेहकर येथील ई-क्लास शेती गट नं.२९६ मध्ये प्रत्येकी ०.८० हे.आर. ते १.०० हेक्टर जमिनीवर सन १९७८ साली काही शेतकºयांनी अतिक्रमण केले होते. त्यानंतर १९९१ मध्ये जमिनीचा भाडेपट्टा सुध्दा त्यांना मिळाला आहे. भाडेपट्टा मिळाला तेव्हापासून शेतकरी शेती वहिती करीत आहे. शेतात जाण्यासाठी जुनी वहिवाटी असलेला रस्ता गट नं.२९४ कैलास जनार्धन सोनुने, गट नं.२९५ दिलीप उत्तम काळे, गट नं.२९५ सुशिला सुभाष काळे यांच्या धुºयाने बैलगाडीचा वहिवाटी रस्ता होता. याच रस्त्याने सर्व लोक शेती वहिती करीत होते. परंतु शेतात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेत रस्त्याच्या मागणीसाठी मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात पिंपळगाव उंडा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये ननहरी सिताराम अंभोरे, शामराव भिवसन कव्हळे, दामोधर जाधव, संतोष आंभोरे, भिमसन नाटेकर, भिमराव आंभोरे, संतोष आंभोरे, सोनाबाई क व्हळे, सुखदेव वानखेडे, सुशिलाबाई आंभोरे, दिपक आंभोरे, मंडाबाई आंभोरे, दगडाबाई जाधव, मालताबाई आंभोरे, रमाबाई आंभोरे, आकाश नाटेकर, विलास क व्हळे यांचा सहभाग आहे.
(प्रतिनिधी)