शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:26 IST

Khamgaon News खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. 

ठळक मुद्देअभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात कमालीची घट येते; मात्र वन्य प्राण्यांनी नुकसान केले तर त्याची भरपाई वन विभागाकडून देण्यात येते. खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली असून, ३ लाख ७३ हजार ६०५ रुपये मंजूर झाले आहे. गत काही वर्षांपासून जंगलांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे प्राण्यांचे अधिवास संपले. त्यामुळे रोही, हरीण, चितळ, जंगली डुकरांनी शेताकडे आपला मोर्चा वळविला असून, मोठ्या प्रमाणात पिके फस्त करतात. या अभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात घट येते.. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्याकरिता शेतक-यांना नुकसानाची माहिती ४८ तासाच्या आत वन विभागाला देणे आवश्यक आहे.  

व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळतात १५ लाख वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपये भरपाई मिळते. तसेच व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो. खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास २० हजार रुपये प्रती व्यक्ती देण्यात येते. 

पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास  गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळते. तसेच मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.   गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.  

शेतात वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले तर शेतक-यांना भरपाई मिळते. त्याकरिता शेतक-यांनी ४८ तासांच्या आत वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात व त्यांना भरपाईसुद्धा देण्यात येत आहे.- के. डी. पडोळ वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी