शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतकर्‍यांच्या दावणीला बैलांऐवजी ट्रॅक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:17 AM

बुलडाणा: जिल्ह्यात गाय, बैल व म्हैस अशी एकूण ६ लाख ९0  हजार जनावरे आहेत. आधुनिक शेतीची कास धरणार्‍या शे तकर्‍यांच्या दावणीलाही आता बैलांएवजी ट्रॅक्टर दिसत  असल्यामुळे एकूण जनावरांच्या तुलनेत बैलांची संख्या ३८ टक् क्यावर आली आहे. बैलांची संख्या घटत असल्याने जिल्ह्यात  केवळ २ लाख ६५ हजारच बैल उरले आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यात बैलांची संख्या घटली एकूण जनावरांच्या तुलनेत ३८ टक्केच बैल

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गाय, बैल व म्हैस अशी एकूण ६ लाख ९0  हजार जनावरे आहेत. आधुनिक शेतीची कास धरणार्‍या शे तकर्‍यांच्या दावणीलाही आता बैलांएवजी ट्रॅक्टर दिसत  असल्यामुळे एकूण जनावरांच्या तुलनेत बैलांची संख्या ३८ टक् क्यावर आली आहे. बैलांची संख्या घटत असल्याने जिल्ह्यात  केवळ २ लाख ६५ हजारच बैल उरले आहेत. बैलांच्या भरवशावर केली जाणारी शेती आता आधुनिकीरणामुळे  ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने  बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किमती, त्यांना  पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेला  असल्याने बैलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. शेतातील  नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे  करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे  इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या  उरली आहे. सन २00३, २00७ व २0१२ या वर्षी झालेल्या  पशुगणनेनुसार बैलांची संख्या हजारोने कमी होत असल्याचीच  आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात सध्या गाय, म्हैस व बैल  अशी एकूण जनावरे ६ लाख ९0 हजार आहेत. त्यापैकी म्हशी १  लाख ५0 हजार, गायी २ लाख ७५ हजार व बैल २ लाख ६५  हजार आहेत. यावरून जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांकडे  बैलजोडी नसल्याचे दिसून येत आहे.  शेतीत वाढते यांत्रिकीकरण,  सालगड्यांची टंचाई, चाराटंचाई, बैलांच्या वाढत्या किमती, एकत्र  कुटुंबपद्धती कमी झाल्याने अल्पभूधारक बनलेल्या शेतकर्‍यांना  बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शे तकर्‍यांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शे तीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणून कामे पूर्ण करत आहेत.   

पोळ्याला कृत्रिम बैलांची पूजापूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्र त्येक घरी बैलांची पूजा केली जात होती; मात्र आता शेतकर्‍यांकडे  बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकर्‍यांना  मातीच्या तथा कृत्रिम बैलांची पूजा करावी लागणार आहे.

ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याची प्रथाअल्पभूधारक शेतकर्‍यांनाही शासनाकडून अनुदानावर मिनी ट्रॅ क्टर वाटप केल्या जात आहे. त्यामुळे मोठे शेतकरीच नव्हे तर  अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या दारातही ट्रॅक्टर उभे दिसत आहे.  बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैलांचे प्रमाण कमी होत आहे.  त्यामुळे जिल्ह्यात मेहकरसह काही गावांमध्ये ट्रॅक्टरचा पोळा  भरविण्याचा प्रथा रूढ होत असल्याचे दिसून येत आहे.