शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

शेतकर्‍यांनो, देशव्यापी संपासाठी तयार राहा - रविकांत तुपकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:59 AM

चिखली : भाजपा सरकारने शेतकर्‍यांना अक्षरश: वार्‍यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांना मोठी लढाई  लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंदोलनासाठी शेतकर्‍यांनी सज्ज राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.

ठळक मुद्देसोनेवाडी येथील सभेत रविकांत तुपकर यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : भाजपा सरकारने शेतकर्‍यांना अक्षरश: वार्‍यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांना मोठी लढाई  लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंदोलनासाठी शेतकर्‍यांनी सज्ज राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.

तालुक्यातील सोनेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन रविकांत तुपकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे उपस्थित होते. यानिमित्त पार पडलेल्या सभेत शेतकरी व संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लवकरच देशव्यापी आंदोलन उभे करणार असल्याची माहिती देऊन भाजप सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. सोयाबीनला भाव दिला नाही. बोंडअळीच्या अनुदानाची केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात मात्न शेतकर्‍यांच्या खात्यात एक छदामही मिळाला नाही. आता पुन्हा गारपिटीने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी पार कोलमडून गेला असून,  गारपीटग्रस्तांनासुद्धा हे सरकार वार्‍यावर सोडते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. केवळ घोषणा करून सरकार मोकळे होत आहे. त्यामुळे या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांना मोठी लढाई लढावी लागणार असल्याने आंदोलनासाठी शेतकर्‍यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले. तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली. प्रसंगी अमोल हिप्परगे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन, बबनराव चेके, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, राम अंभोरे, नीलेश राजपूत,  शे.मुक्त्यार, भारत फोलाने, सुधाकर तायडे, रमेश सिरसाट, आत्माराम पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर