शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

शेतकऱ्याने दहा एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:48 PM

Agriculture News : प्रशांत खोडे या शेतकऱ्याने ५ एकर मालकीचे व ५ एकर भाडेतत्त्वावरील असे एकूण १० एकर क्षेत्रफळात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूरः  पावसाने दांडी मारल्याने संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यावर दूबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील बावनबिर येथील एका शेतकऱ्याने सोयाबीन पिक कोमजू लागल्याने १० एकरातील पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला आहे. येथील प्रशांत खोडे या शेतकऱ्याने ५ एकर मालकीचे व ५ एकर भाडेतत्त्वावरील असे एकूण १० एकर क्षेत्रफळात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. सुरुवातीला पाऊस चांगला पडल्याने पेरलेले सोयाबीन चांगल्याप्रकारे उगवले. पेरणी साधल्याने हा शेतकरी आनंदात होता. मात्र या शेतकऱ्याची खूशी फार काळ टिकू शकली नाही. वरूणराजा प्रकट होऊन पिकांना जीवदान देईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या हाती निराशा लागली. वरुणराजाने डोळे वटारल्याने निघालेले सोयाबीन पिक सूकल्याने शनिवारी रोजी या शेतकऱ्याने तब्बल १० एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवले आहे. दि. १७ जूनला या शेतकऱ्याने दहा एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. पाऊस चांगला पडल्याने सोयाबीन तासी दिसू लागले. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेले सोयाबीन कोमजू लागले. पाण्याअभावी ७० ते ८० टक्के पिक नष्ट झाल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने नागरणी करून शेत मोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. संग्रामपूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने बगल दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालूक्यात पावसाअभावी वाळलेल्या पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षापासून संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळासह कमी पाऊस, जास्त पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांना तोंड देत आहे. शासन स्तरावरून दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गही साथ देत नसल्याने आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आता दूबार पेरणीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हजेरी लावल्याने मुगात पेरणी झाली. यंदा चांगला पाऊस बरसणार अशा हवामान खात्याच्या वावड्या उडाल्याने शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न पडू लागले. मोसमात पेरणी झाल्याने तसेच पिका पूरता पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते. मात्र चेहऱ्यावरील हसू फार काळ टिकू शकले नाही. पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी पाहलेले हिरवे स्वप्न आता काळे पडू लागले आहे. पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असल्याने बावनबिर येथील शेतकऱ्याने तब्बल दहा एकर पिकावर नांगर फिरवला आहे. यावरून शेतकऱ्यांच्या भयावह परिस्थितीची जाणीव होत आहे. शासनस्तरावरून आर्थिक बळ मिळेल या आशेवर येथील शेतकरी आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरीagricultureशेती