सूनगाव येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 18:07 IST2021-08-21T18:07:22+5:302021-08-21T18:07:56+5:30
A farmer died of snake bite : उपचार सुरु असताना त्यांचा शनिवार २१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सूनगाव येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
जळगांव जामोद : तालुक्यातील ग्राम सूनगाव येथील शेतकरी रामदास देविदास सोनटक्के (४६) हे आपल्या शेतात काम करत असतानाच त्यांना सर्पदंश झाला होता. उपचार सुरु असताना त्यांचा शनिवार २१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
सूनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष रामदास सोनटक्के हे १४ ऑगस्ट शनिवारला आपल्या शेतात ठिबकच्या नळ्या दुरुस्त करत असताना त्यांना सर्पदंश झाला.त्यांनी तातडीने आपल्या भावाला गजानन सोनटक्के यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून माहिती दिली.गजानन सोनटक्के यांनी त्यांना तात्काळ जळगांव जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. मागील सात दिवस ते मृत्युशी झुंज देत होते.अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.गावात शांत,संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.